राज्यस्तरीय “आदर्श संस्था पुरस्कार”ासाठी निवड; पंढरपूर तालुक्यातील संस्थेचा सन्मान… राजन किड्स स्कूल सुस्ते,
सोलापूर, प्रतिनिधी :-दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंढरपूर तालुक्यातील राजन किड्स स्कूल सुस्ते एका नामांकित संस्थेची “आदर्श संस्था पुरस्कार”ासाठी निवड करण्यात आली आहे. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, पालकांच्या विश्वासाने व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने संस्था अल्पावधीतच नामांकित होत आहे.संबंधित संस्थेने आपल्या कार्यकाळात शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि समाजाभिमुख प्रकल्पांची अंमलबजावणी करणे या माध्यमातून संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय “आदर्श संस्था पुरस्कार”ासाठीरा राजन किड्स स्कूल सुस्ते संस्थेची निवड करण्यात आली आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता इंदुताई स्मृती मंदिर, पार्क चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संस्थेचा गौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या कार्याचा गौरव होत असल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
