🏥🌸 तुंगत PHC उपकेंद्रात भव्य महिला शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; ११ महिलांवर शस्त्रक्रिया, डॉ. सर्जन नंदकुमार शिंदे यांचा सत्कार…
✍️ मुख्य संपादक. राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल.
पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) उपकेंद्रात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष शस्त्रक्रिया शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामध्ये ११ महिलांवर बिगर टाका (Stitchless) शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण आरोग्य शिबिरात अनुभवी शल्यचिकित्सक डॉ. नंदकुमार शिंदे यांनी अत्यंत कुशलतेने शस्त्रक्रिया पार पाडल्या. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेल्या या बिगर टाका शस्त्रक्रियांमुळे महिलांना कमी वेदना, कमी कालावधीत बरे होणे आणि लवकर दैनंदिन जीवनात परतता येणे शक्य झाले आहे.

💐 शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि रुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सर्जन नंदकुमार शिंदे यांचा तुंगत PHC उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉ.गावडे मॅडम डॉ.क्षीरसागर मॅडम व कर्मचारी आरोग्य सेवकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
👩⚕️ ग्रामीण भागातील महिलांना दर्जेदार व तज्ज्ञ आरोग्यसेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले. अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा शासकीय आरोग्य यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
🌟 महिलांच्या आरोग्यसुरक्षेसाठी तुंगत PHC उपकेंद्राचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरला आहे.
