पाच लाख रुपयांची खंडणी मागून शासकीय वाळू वाहतूक बंद करण्याची

पंढरपूर तालुक्यातील तक्रारदारच निघाला वाळूचोर व खंडणीखोर

पंढरपूर (प्रतिनिधी): पाच लाख रुपयांची खंडणी मागून शासकीय वाळू वाहतूक बंद करण्याची धमकी देत एका युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बिटरगाव पाटी, सुस्ते (ता. पंढरपूर) येथे घडली. या प्रकरणी बालाजी ऊर्फ तुषार तानाजी नागटिळक, विशाल तानाजी नागटिळक, तानाजी नागटिळक तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अंजनसोंड येथील भीमा नदीपात्रातून शासकीय वाळू उपसा सुरू असून श्रीकांत भिंगारे हे त्या वाळू साठ्यावर काम करतात. घटनेच्या दिवशी श्रीकांत भिंगारे, प्रताप माणिक माने आणि अरविंद भिमराव आटकळे हे बिटरगाव स्टॉप येथे थांबले असताना आरोपी तेथे आले. “या भागातून वाळू वाहतूक करायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्या, अन्यथा वाहतूक करू देणार नाही,” अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपींनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीकांत भिंगारे यांच्या अंगावर धाव घेतली. यावेळी बालाजी ऊर्फ तुषार नागटिळक याने हातातील कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. भिंगारे यांनी प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने तो डोक्याऐवजी हातावर बसला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत
या दाखल फिर्यादीमधिल बालाजी नागटिळक हा वारंवार महसूल व पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या बाबत खोट्या स्वरुपाच्या लेखी तक्रारीही देत असल्याचे समोर येत आहे तसेच याच्यावर अवैद्य वाळूचोरीचेही गुन्हे दाखल असून या बाबत आजपर्यंत वारंवार नागटिळक हा तक्रारी देत होता परंतु या घडल्या प्रकारानंतर तक्रारदार बालाजी नागटिळकच खंडणीखोर व वाळूचोर असल्याचे दिसून आले आहे

 

सदरच्या शासकीय ठेक्याविरोधात बालाजी ऊर्फ तुषार तानाजी नागटिळक याने महसूल प्रशासनाकडे व पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दिले होते व त्याच अर्जावर मी दिलेले अर्ज विनाकारवाई निकाली काढणे माझी काहीही हरकत नाही मला ठेकेदारांनी नुकसान भरपाई दिलेली आहे.तसेच येथे बेकायदेशीर काहीही होत नाही असे लेखी देऊन अर्ज माघारी घेतला होता. या अगोदरही बालाजी नागटिळक याच्यावर वाळू चोरीचे गुन्हा दाखल आहे या घटनेमुळे सुस्ते परिसरासह परिसरात खळबळ उडाली असून शासकीय वाळू वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!