बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात,आक्षेपार्ह पोस्टविरोधात ,अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ,पंढरपूर ,

 

संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चैनल व पोर्टल,

पंढरपूर,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संविधानिक मूल्यांचे पालन करणारे, वंचित, शोषित आणि दुर्लक्षित समाजघटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे महान नेते आहेत, ते संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व तमाम कार्यकर्ते व आंबेडकरवादी तरुणांची ‘अस्मिता’ व ‘प्रेरणा’ आहेत त्यांच्या बद्दल सोशल मीडियावर काही जातीय द्वेशातून जाणून बुजून हेतू पुरस्पर अपमानास्पद पोस्ट्स केल्या जात आहेत, ज्यामुळे समाजातील भावनांना ठेस पोहोचली आहे..!

 

 

अशा प्रकारच्या पोस्ट्स समाजात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या असून, सामाजिक सलोखा आणि शांततेस धोका निर्माण करणा-या आहेत त्यामुळे आम्ही संबंधीत व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

 

 

आमचा उद्देश कोणावर वैयक्तिक हल्ला करणे नसून, समाजात द्वेष, जातीभेद आणि असमानता वाढवणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत रोखणे हा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *