डॉ. प्रणिता भालके उमेदवार; त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा — खासदार प्रणिती शिंदे

 

 

👉 भाजपकडे विकासावर बोलायला काहीही नाही : खासदार प्रणिती शिंदे

पंढरपूर, दिनांक, १६ नोव्हेंबर २०२५

 

प्रतिनिधी,: पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही घोषणा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. यानंतर आज डॉ. भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

स्व. आमदार भारत नाना भालके यांच्या सामाजिक कार्याची परंपरा डॉ. भालके पुढे नेत आहेत. विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी चांगली मते मिळवून जनतेचा विश्वास संपादन केला होता, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

 

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉ. प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”

 

भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, “भाजपकडे विकासावर बोलायला काहीही नाही. निवडणूक मॅनेजमेंट, मतचोरी, भ्रष्टाचार, जातीपातीचे विष पेरून समाजात फूट पाडणे — हेच त्यांचे राजकारण. भाजपने देशाला कीड लावली आहे.”

 

डॉ. भालके यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी पंढरपूरच्या नागरिकांनी विकासाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

 

यावेळी सोलापूर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सातलींग शटगर,सोलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बजरंग बागल, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहर अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, अमर सूर्यवंशी, किरण घाडगे,राजू उराडे, राहुल पाटील, सतीश आप्पा शिंदे, सुहास भाळवणकर, मिलिंद अडवळकर,समीर कोळी, नागेश गंगेकर, रणजीत पाटील, शिवाजी धोत्रे, संदीप शिंदे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *