पंढरपूर नगर परिषदेसाठी दुसऱ्या दिवशी 17 अर्ज माघारी,

पंढरपूर नगर परिषदेसाठी दुसऱ्या दिवशी 17 अर्ज माघारी

संपादक पंढरपूर :दिनांक 20 पंढरपूर नगर परिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश रोकडे यांनी दिली

पंढरपूर नगर परिषदेच्या 17 नगरसेवक पदासाठी एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल आहेत तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते यात नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी 223 उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत उमेदवारी वैद्य ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दिनांक 21 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 19 रोजी एक सह अर्ज माघार घेण्यात आला नाही .मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिनांक 20 रोजी 17 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आहेत शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

यांनी अर्ज घेतले माघारी

 

प्रभाग क्रमांक दोन ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर, अश्विनी श्रीनिवास बोरगावकर अपक्ष, प्रभाग क्रमांक 9 ब मधून राजू शमशुद्दीन सत्तार मेकर अपक्ष, जावेद कासिम शेख अपक्ष, सुनील मोहन अधटराव अपक्ष, प्रभाग क्रमांक 13 अ मधून रुक्मिणी धनाजी धोत्रे अपक्ष, प्रभाग क्रमांक 13 बघ मधून राजन बळीराम थोरात अपक्ष, प्रभाग क्रमांक 14 मधून शैलजा बाळासाहेब कसबे, अपक्ष, प्रतीक्षा ऋषिकेश भालेराव अपक्ष, प्रभाग क्रमांक 14 ब मधून विजय परमेश्वर वर्पे अपक्ष, तुळजाराम माणिक धोत्रे अपक्ष, प्रभाग क्रमांक 17 मधून प्रसाद श्रीमंत यादव अपक्ष, उमेश भगवान सर्व रोड अपक्ष, अंबालाल किसन दोडिया अपक्ष, प्रभाग क्रमांक 17 ब मधून उमा उमा संजय घोडके विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी, उमा संजय घोडके अपक्ष, यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *