विधान परिषद निवडणूक 2026 : भाजपकडून प्रशांत परिचारक यांचा पत्ता कट?

विधान परिषद निवडणूक 2026 : भाजपकडून प्रशांत परिचारक यांचा पत्ता कट? आश्वासनांवर दिवस काढण्याची वेळ?

मुख्य संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू असून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार Prashant Paricharak यांचे नाव यंदा मागे पडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जिल्ह्यातील मजबूत संघटनात्मक ताकद असूनही परिचारक यांना अद्याप स्पष्ट संकेत मिळाले नसल्याने त्यांना केवळ आश्वासनांवर दिवस काढण्याची वेळ आली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर खलबते सुरू असून सहा जागांसाठी तब्बल १२ इच्छुकांनी दावेदारी केल्यामुळे पक्षात चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषदेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून ही नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उमेदवारांची निवड करताना पक्षाकडून जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यावरही विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे.

सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये Ranjitsinh Nimbalkar, Sanjaykaka Patil, Archana Patil Chakurkar, Madhavi Naik, Ram Satpute, Rajesh Pandey, Sanjay Kenekar, Dadarav Keche, Sanjay Bhende, Sandeep Joshi, Dayashankar Tiwari आणि Pragya Satav यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात Prashant Paricharak यांचा स्वतंत्र राजकीय गट असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र पक्षातील अंतर्गत स्पर्धा आणि प्रादेशिक समीकरणांमुळे अंतिम यादीत कोणाला संधी मिळणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

एकूणच, विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून कोणाची ‘लॉटरी’ लागणार आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!