एकनाथ स्वाभिमानी शिक्षक पुरस्कारांचे ५ मे रोजी वितरण

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक पुरस्कारांचे ५ मे रोजी वितरण; मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा…

अंकोली, प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक 

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय “आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व कर्मचारी” पुरस्कारांचे वितरण मंगळवार, ५ मे रोजी होणार आहे. हा भव्य सन्मान सोहळा सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब आडसुळे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून, रोजगार हमी व फलोत्पादन विभागाचे मंत्री भरतशेठ गोगावले तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यावेळी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख खासदार हातकणंगले, तसेच लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील माने, भावी शिक्षक आमदार मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित हा पुरस्कार सोहळा शिक्षक व संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!