खवणीत मंगळवारी श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा; दूध अभिषेक,

💥खवणीत मंगळवारी श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा; दूध अभिषेक, धनगरी ओव्या व महाप्रसादाची भव्य तयारी…

✍️अंकोली, प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल – सहसंपादक

मोहोळ तालुक्यातील खवणी येथे ग्रामदैवत श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. ५ मे रोजी सकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, यानिमित्त दूध अभिषेक, जंगी धनगरी ओव्या कार्यक्रम आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांच्या वतीने तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ३ मे रोजी संपूर्ण गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर जंगी धनगरी ओव्यांच्या कार्यक्रमाने जागरण सोहळा रंगणार आहे.

मंगळवार दि. ५ मे रोजी सकाळी सहा वाजता श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळ्यासह दूध अभिषेक विधी पार पडणार आहे. दुपारी बारा वाजता सर्व पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती होणार असून, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी नऊ वाजल्यानंतर विद्युत रोषणाईने या भव्य सोहळ्याची सांगता होणार आहे.

या उत्सवासाठी पंचक्रोशीतील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, सर्व भक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खवणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!