अंकोली, मोहोळ व चिकमहूद सांगोला परिसरात आनंदोत्सव; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव ✨

💥 मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक सेवाभावाच्या जोरावर सचिन जाधव यांची सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी निवड ….

✨ अंकोली, मोहोळ व चिकमहूद सांगोला परिसरात आनंदोत्सव; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव ✨

 

✍️ अंकोली प्रतिनिधी : दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.

📍सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावचे सुपुत्र सचिन अशोक जाधव यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक सेवाभावाच्या बळावर पोलिस खात्यात आणखी एक मानाचा टप्पा गाठत सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती मिळविली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावासह मोहोळ तालुक्यातील अंकोली परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🌟 विशेष बाब म्हणजे, सचिन जाधव हे मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब {तात्या }क्षीरसागर यांचे नातजावई तसेच किशोर {बप्पा }क्षीरसागर यांचे जावई आहेत. त्यांच्या या निवडीमुळे अंकोली, मोहोळ, चिकमहूद तसेच संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

👮‍♂️ सचिन जाधव यांनी आपल्या सेवाकाळात पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली आहे. पुणे शहरातील चंदननगर, शिवाजीनगर, विमाननगर, चतुःशृंगी यांसारख्या महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कार्यक्षमतेची आणि कर्तव्यदक्षतेची वेगळी ओळख निर्माण केली.

🚨 गुन्हे उकलण्यात दाखविलेली तत्परता, नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेली मेहनत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली उत्कृष्ट सेवा यामुळे त्यांनी पोलिस खात्यात विश्वासार्ह अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

🏅 सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील अनेक युवकांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

🌱 आज ग्रामीण भागातील युवक स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, एमपीएससी, यूपीएससी अशा क्षेत्राकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. अशा परिस्थितीत सचिन जाधव यांचे यश हे युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणांमध्ये नवीन उमेद आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

💐 त्यांच्या निवडीबद्दल अंकोली, मोहोळ, चिकमहूद परिसरातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎉 “कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवा” या तत्त्वावर काम करणाऱ्या सचिन जाधव यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!