🏆🌟 ATS प्रज्ञाशोध परीक्षेत इनोव्हेटिव्ह स्कूल अंकोलीची दैदिप्यमान कामगिरी; 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले 🌟🏆
🥇 राज्य, जिल्हा आणि केंद्र स्तरावर घवघवीत यश; शिक्षण क्षेत्रात अंकोलीचा नावलौकिक उंचावला 🥇
📍 अंकोली प्रतिनिधी : दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूल ने ATS प्रज्ञाशोध परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शाळेतील तब्बल 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकल्याने संपूर्ण परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🏅 या यशामध्ये राज्यात 4 विद्यार्थी, जिल्ह्यात 8 विद्यार्थी तर केंद्रात 37 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच इंचगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत शाळेने गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे.
🌸 अन्वी अजिंक्य क्षीरसागर हिने विशेष उल्लेखनीय कामगिरी करत केंद्रात प्रथम, जिल्ह्यात चौथा आणि राज्यात सातवा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
📚 या दैदिप्यमान यशामागे शाळेचे मुख्याध्यापक रियाज तांबोळी सर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घेतलेले अथक परिश्रम हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष कौतुकास्पद मानली जात आहे.
🌟 शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, नियमित सराव, प्रेरणादायी अध्यापन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवून दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचे कार्य शिक्षकांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले.
👏 विद्यार्थ्यांच्या यशासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक, मॅडम, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शाळेच्या या यशामुळे अंकोली परिसराचा शैक्षणिक गौरव अधिक उंचावला असून विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.
🌹 यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक रियाज तांबोळी सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका व पालकांचे हार्दिक अभिनंदन! 🌹
