🌿🌍 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे (सोलापूर) येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न …. 🌍🌿
📍 ✍️ अंकोली, प्रतिनिधी : दादासाहेब जगताप | संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
📅 दि. 05 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे (जि. सोलापूर) कार्यस्थळावर विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांचे भव्य वृक्षारोपण अत्यंत उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्माण करणे तसेच भावी पिढीसाठी स्वच्छ, शुद्ध व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
🌱✨ या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्री. सिध्दाराम चाकोते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

👥🌿 कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर व अधिकारी :-
▪️ कारखान्याचे संचालक श्री. जम्मा साहेब
▪️ कार्यकारी संचालक श्री. समीर सलगर साहेब
▪️ जनरल ऑफिस सचिव श्री. शिवशरण पाटील साहेब
▪️ शेतकी प्रमुख अधिकारी व केन मॅनेजर श्री. काशिनाथ पाटील साहेब
▪️ चिफ इंजिनिअर श्री. पांढरे साहेब
▪️ चिफ केमिस्ट श्री. माने साहेब
▪️ सुरक्षा अधिकारी श्री. एन. डी. पाटील साहेब
▪️ अकाउंटंट विभागातील श्री. शरणार्थी साहेब
▪️ पर्यावरण विभाग प्रमुख श्री. वीरभद्रु साहेब
▪️ माती परीक्षण विभाग प्रमुख श्री. गायकवाड साहेब
▪️ सिव्हिल इंजिनियर श्री. कोटगोंड साहेब
▪️ डिझेल पंप इन्चार्ज श्री. पाटील साहेब
▪️ टाईम ऑफिस इन्चार्ज श्री. तोडकरी साहेब
▪️ केनयार्ड इन्चार्ज श्री. शाम गायकवाड साहेब
▪️ कोजन इन्चार्ज श्री. पटेल साहेब
▪️ स्टोअर विभाग इन्चार्ज श्री. कुडल साहेब
▪️ तसेच ऊस पुरवठा अधिकारी नदाफ साहेब, ॲग्री ओव्हरसियर स्टाफ, कर्मचारी वर्ग, सभासद व वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌍🌿 कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वृक्षारोपणामुळे प्रदूषण नियंत्रण, हवामान संतुलन तसेच जैवविविधतेचे संरक्षण शक्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कारखाना परिसर अधिक हरित व स्वच्छ ठेवण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.
🌳💚 उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व वाहन मालकांनी वृक्षारोपण करून “पर्यावरण संरक्षण हीच काळाची गरज” असा प्रभावी संदेश समाजाला दिला.
✨🌱 “झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, भविष्य सुरक्षित करा” 🌱✨
