अंकोली येथील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील, महा-ई-सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या समन्वयातून मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला वेग; ६० ते ७० टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने!..
✍️ अंकोली,प्रतिनिधी:- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील..
🔹 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेत अंकोली गावात प्रशासन, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील, महा-ई-सेवा केंद्र आणि ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. बीएलओ सहाय्यक म्हणून कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या सक्रिय सहभागामुळे सुमारे ६० ते ७० टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने पोहोचले असल्याची माहिती गाव कामगार तलाठी मिलिंद मडखांबे यांनी दिली.
🔹 तलाठी मिलिंद मडखांबे यांनी सांगितले की, घराघरात जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यामध्ये सर्व संबंधित विभागांचे उल्लेखनीय सहकार्य लाभत आहे. त्यामुळे बीएलओंचे काम अधिक वेगाने आणि अचूकपणे पूर्ण होत आहे.
🔹 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंकोली येथील मुख्याध्यापक फोरोज शेख, शिक्षक समाधान गोवर्धनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
🔹 अंगणवाडी सौ छाया क्षीरसागर सेविका सविता गवळी, सुजन पोतदार, लतिका गवळी, मनीषा टोणपे या नागरिकांशी समन्वय साधून माहिती संकलनाचे कार्य करत आहेत.
🔹 आशा वर्कर करिष्मा मुजावर, दिपाली पुजारी, सुजाता गुरव आणि सुवासिनी कामतकर या बीएलओ सहाय्यक म्हणून घराघरात जाऊन माहिती संकलित करण्याचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत.
🔹 महा-ई-सेवा केंद्र, अंकोली येथील गणेश पवार आणि आनंद माळी हे नागरिकांचे ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने मदत करत आहेत.
🔹 भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेअंतर्गत गणना (Enumeration) प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी गणना प्रपत्र करण्यासाठी संपत अडसूळ, ग्रामपंचायत सेवक सचिन गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे, संपत अडसूळ यांनी स्वतःचा मतदार नोंदणीचा फॉर्म भरून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला असून, इतरांनाही वेळेत अर्ज भरून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
🔹 सुनील गवळी यांनी संपूर्ण मोहिमेत समन्वयाची भूमिका पार पाडत विविध अडचणी सोडविणे व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले आहे.
🔹 पोलीस पाटील बापू (कोंडीबा) गोडसे, धान्य पुरवठा अधिकारी तसेच रेशन दुकानदार अण्णासाहेब साळुंखे यांनीही नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून आणि माहिती संकलनासाठी सहकार्य करून मोहिमेला हातभार लावला आहे.
⭐ प्रशासन, तलाठी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महा-ई-सेवा केंद्र, पोलीस पाटील, धान्य पुरवठा विभाग, रेशन दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अंकोली गावातील मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेला उल्लेखनीय गती मिळाली आहे. “अंकोली पॅटर्न” हा समन्वय, लोकसहभाग आणि प्रशासनाच्या प्रभावी कार्यपद्धतीचा आदर्श ठरत असून, ही मोहीम नियोजित वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“सक्षम लोकशाहीसाठी अचूक मतदार यादी – अंकोलीचा आदर्श समन्वय!”
