साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी, मा.उपसरपंच तुषार चव्हाण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी
सुस्ते | प्रतिनिधी :
सुस्ते येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक दिलीप दाजी रंधवे व हनुमंत चव्हाण यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना उपसरपंच तुषार चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, ११ पोवाडे, लोकनाट्य आणि शेकडो गीते लिहून मराठी साहित्य समृद्ध केले. समाजातील कष्टकरी, उपेक्षित आणि सर्वसामान्य माणसांना त्यांनी आपल्या साहित्याचे नायक बनविले. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांतून सामाजिक समतेचा संदेश मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास उपसरपंच तुषार चव्हाण, तानाजी भाऊ हनुमंत चव्हाण, दिलीप रंधवे, गणेश मेंबर, धनाजी चव्हाण, संभाजी चव्हाण, नाना सुरवसे, संजय लोखंडे, रमेश रंधवे, नेताजी वाघमारे, चंद्रकांत चव्हाण, दिलीप शिनगारे, रावसाहेब चव्हाण, समाधान वाघमारे, मसू वाघमारे, पांडू वाघमारे तसेच गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याला अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!