आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण उपक्रमांची रेलचेल)

आ. अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

(गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण उपक्रमांची रेलचेल)

पंढरपूर प्रतिनिधी: राजकीय वाढदिवस केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरते मर्यादित न ठेवता तो समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याची परंपरा कायम राखत, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) धनंजय पाटील यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व घटकांना लाभदायी ठरणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, सर्वरोग निदान शिबिर आणि महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

 

१ ऑगस्ट रोजी कार्यक्रमांची सुरुवात
शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता बाभुळगाव येथील श्री नागनाथ मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर १० वाजता श्री विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आरोग्यसेवेलाही प्राधान्य
३ ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीत रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सर्वरोग निदान शिबिरात अस्थिरोग, फिजिशियन, नेत्ररोग, हिमोग्लोबिन (Hb) व शुगर तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून, कर्करोग जनजागृती, मार्गदर्शन, तसेच आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.

समाजोपयोगी वाढदिवसाची परंपरा कायम
आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजाभिमुख उपक्रम राबविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सेवेला प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

१ ऑगस्ट – स्नेहभोजन, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप. ३ ऑगस्ट – रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप. ५ ऑगस्ट – सर्वरोग निदान शिबिर व विविध आरोग्य तपासण्या. ६ ऑगस्ट – महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर व कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!