माढ्यात पाण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांचे अन्नत्याग आमरण उपोषण.

माढ्यात पाण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांचे अन्नत्याग आमरण उपोषण.

पाटबंधारे विभागाने १७ ऑगस्टला पाणी सोडण्याचे दिले लेखी आश्वासन पाळले नसल्याने कानडे यांचे माढ्यात अन्नत्याग उपोषण.

 

माढा प्रतिनिधी शरद भांगे, दिनांक २५ ऑगस्ट: सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी माढा तहसील ऑफिस समोर दुसऱ्यांदा अन्नत्याग आमरण उपोषण मंगळवारी सुरू केले. याआधीही १० ऑगस्ट रोजी माढा तहसील ऑफिस समोर माजी जि प सदस्य आनंदराव कानडे यांनी पाण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण केले होते. परंतु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी मनकर्णा ओढा चिंचोली उपळाई खुर्द व इतर तुमच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले होते. पाटबंधारे विभागाने दिलेल्या वेळेत आश्वासन न पाळल्याने पुन्हा त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व माढ्याच्या तहसीलदार संजय भोसले यांनी उपोषण स्थळी भेट दिली असून उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु कानडे हे जोपर्यंत मनकर्णा ओढा चिंचोली उपळाई खुर्द व इतर ठिकाणी पाणी येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. यावेळी माढ्यासह परिसरातील शेतकरी बांधव संघर्ष समितीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!