(रखुमाई फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम)
पंढरपूर : केवळ देखावे आणि ध्वनीप्रदूषण न करता, सार्वजनिक नवरात्रोत्सव अधिक अर्थपूर्ण व समाजहितकारी बनवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भोसे याठिकाणी रखुमाई फाउंडेशनच्या माध्यमातून डाॅ.मृदुला तळेकर आणि डाॅ. औदुंबर तळेकर डाॅक्टर दाम्पत्य प्रयत्न करीत असल्याने नऊ दिवस नवरात्रोत्सव काळात महिलांसाठी विविध अभिनव आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबविल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सण, उत्सव हे धर्म, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेसाठी असावेत यावर भर देत भोसे याठिकाणी गेले नऊ दिवस आयोजित उपक्रमात
मातृशक्तीचा सहभाग वाढवणे, महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून त्यांना उत्सवांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेण्यावर विशेष भर देण्याचा प्रयत्न या डाॅक्टर दाम्पत्यांनी करून एक आदर्श ठेवला आहे. यामध्ये रखुमाई फाउंडेशनचे माध्यमातून सोमवार दि.२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज सायं. ७:३० ते ९:३० या वेळेत महिलांसाठी सामुदायीक दांडिया व महिलांचे विशेष कला-गुण सादरी करण कार्यक्रम घेण्यात आले. देवीची गाणी, देवीचा गोंधळ, भारुड , नकला, कथा-कथन, झांज-पथक, गायन, भजन महिलांचे, यशस्वी महिलांच्या मुलाखती कार्यक्रम डाॅ.मृदुला तळेकर आणि डाॅ.औदुंबर तळेकर यांनी आयोजित केले होते. नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमास भोसे परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदविला होता.
नवरात्रोत्सव काळात आयोजित या कार्यक्रमास श्रीमती पुष्पा गुळमे, ज्योती शिंदे, सारिका तळेकर, तेजश्री तळेकर, रेश्मा तळेकर, अनिता तळेकर, पुष्पा साळुंखे, योगिता माळी, रूपाली लावर मॅडम, पुनम सरडे, बालिका कोरके, जयश्री गावंधरे, रखुमाई तळेकर, राही तळेकर, राजश्री सरडे, सुगंधा, गावंधरे, सुजाता लिंगे, मिना तळेकर, स्नेहा अडगळे, ललिता अडगळे, लाडाबाई अडगळे, सोनाली नाईकनवरे, लता शेरखाने, मैमुना पठान, जुनैखा शेख, मीरा तळेकर, प्रतिभा पाटोळे, आश्विनी देवकते यांनी नऊ दिवस परिश्रम घेत कार्यक्रमाची सांगता केली.
शारदीय नवरात्रोत्सव काळात भोसे या गावात गाव गाड्यातील महिलांचे कला गुणांना रखुमाई फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो त्यास चांगला प्रतिसाद महिलांकडून दिला जात असुन विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमासह सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत.यास भोसे परिसरातील महिलांमधुन चांगला प्रतिसाद मिळत असतो.