जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे #लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५ मधील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (#ITI) मध्ये देशात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल, आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
बांधकाम मजूर असलेल्या वडिलांच्या कष्टावर आणि आईच्या प्रोत्साहनावर उभी राहिलेल्या मदियाचे हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.