इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 13 पंचायत समित्यांची पंचायत समिती आरक्षण सोडत सन -2025
जिल्हाधिकारी श्री जितेंद्र ङुडी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली
*सोडत कार्यक्रमानुसार पंचायत समिती निहाय निश्चित झालेले आरक्षण*
1) इंदापूर ___*अनुसूचित जाती*
2) जुन्नर__*अनुसूचित जमाती महिला*
3) दौंड_ *नागरिकांचा मागासवर्ग*
4) पुरंदर__*नागरिकांचा मागासवर्ग*
5) शिरूर__ *नागरिकांचा मागासवर्ग महिला*
6) मावळ__ *नागरिकांचा मागासवर्ग महिला*
7) वेल्हे__ *सर्वसाधारण महिला*
8) मुळशी__ *सर्वसाधारण महिला*
9) भोर___ *सर्वसाधारण महिला*
10) खेड_ *सर्वसाधारण महिला*
11) हवेली____ *सर्वसाधारण*
12) बारामती___ *सर्वसाधारण*
13) आंबेगाव___ *सर्वसाधारण*
अशी आहे पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांची पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी श्री जितेंद्र ड्युटी साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर केलेली पंचायत समिती निहाय निश्चित झालेली आरक्षण जाहीर
नुकतेच त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. या निवडणुकीत नगरपरिषद महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येतात.
पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर ते या निवडणुकीत पहिल्यांदा सामोरे जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे. पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर होताच आता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुणे जिल्ह्यातील राजकारणाकडे लागलेल आहे.

अनेक वर्ष पुणे जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पुढारी हे बसले होते पंचायत समितीच्या खुर्चीची वाट पाहत. त्यासाठी कोणत्या तालुक्यातील कोणती खुर्ची कुणाला द्यायची ही आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी थोडक्यात जाहीर केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
इंदापूर तालुक्यात अनेकांचे डोळे पंचायत समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत. पण यांच्याकडे आत्तापासूनच पंचायत समिती सभापती पदासाठी पूर्ण ताकतीनिशी फील्डिंग लावून तयार आहेत.
