संपादक राम गायकवाड दि.9 – भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीवादी आरोपीवर एट्रोसीटी अॅक्ट नुसार कारवाई केली पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे घटनात्मक सन्माननीय म्हत्वपुर्ण पद आहे.सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रद्वोह ठरविण्यात यावा असा गंभीर गुन्हा आहे.सरन्यायाधीशावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत.असा ठराव आज झालेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आला.
सांताक्रुझ पूर्व कालीना येथे ही बैठक झाली.

महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदान येथे येत्या दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सर्व बौध्द जनतेच्या एकजुटीचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.त्याच्या पूर्वतयारीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी पुज्य भदंन्त राहुल बोधी महाथेरो, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे,पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यध्यक्ष जयदिप कवाडे,रपाइं एकता वादीचे नाना इंदिसे,अर्जुन डांगळे,दलित पँथरचे बाळासाहेब पडवळ,सुरेश केदारे,शिवसेने चे राजु वाघमारे,रवि गरुड,रिपाइं चे गौतम सोनावणे,काकासाहेब खंबाळकर युनायटेड रिपब्लिकन चे तानसेन ननावरे; ,पिपल्स रिपब्लिकन चे मिलिंद सुर्वे,स्वाभिमानी रिपाइं चे सागर संसारे,रिपाइं डेमोग्रफीक चे दिलीपदादा जगताप,राष्ट्रवादी रिपब्लिकन चे नामदेवदादा साबळे,शिवसेना उबाठा चे विलास रुपवते, रिपाइं गवई गटाचे आनंद खरात,नितीन मोरे,धम्म सहिता ऍक्शन कमिटी चे अॅव्ह.दिलीप काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी तसेच सर्व पक्षीय बौध्द नेते सर्व बौध्द संगटना यांच्या एकजुटीतुन सर्व बौध्द आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे काढण्यात येणार असुन बुध्दगया येथील महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे या मागणीचे निवेदन राज्य सरकारला देण्यात येणार आहे.त्या मोर्चाची तयारी महाबोधी माहविहार मुक्ती आंदोलन कृती समीतीच्या वतीने सर्व बौध्द करीत आहेत.या मोर्चात सर्व बौध्द जनतेने गट-तट आणि पक्ष भेद विसरुन मोठ्या संख्येन सामील झाले पाहिजे.याबाबत चे आवाहन सर्व रिपब्लिकन गटांनी आणि सर्व पक्षीय बौध्द नेत्यांनी आप-आपल्या परीने करावी अशी सुचना यावेळी ना.रामदास आठवले यांनी केली.
14 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे महाबेधी महाविहार मुक्ती आंदोलनात सर्व बौध्द आंबेडकरी जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .
