इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत,

 

इंदापूर प्रतिनिधी विठ्ठल काळे :जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत इंदापूर पंचायत समिती मधील 16 गणांकरिता आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. इंदापूर मधील राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये दुपारी बाराच्या सुमारास ही सोडत पार पडली ईश्वर चिठ्ठीद्वारे संस्कृती अजय गायकवाड या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतील निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या काहींच्या पदरी निराशा आली तर काहींना अचानक लॉटरी लागणार आहे जवळपास गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या. आत्ता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अनेकांनी मैदानात संपर्क वाढवला होता वेगवेगळ्या गणांमधून अनेक जण पंचायत समितीच्या करता इच्छुक होते आणि तयारीला देखील लागले होते मात्र आजच्या स्मृतीमुळे काहींच्या पदरी निराशा पडली तर काहींना अचानक लॉटरी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

*असं असेल आरक्षण*

सर्वसाधारण महिला आरक्षण

1) भिगवन गण (131)

2) पळसदेव गण (133)

3) माळवाडी गण (135)

4) वडापुरी गण (136)

*नागरिकांचा मागास प्रवर्ग*

5) बिजवडी गण (134)

6) निमगाव केतकी गण (137)

*नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला*

7) बावडा गण (145)

8) लाखेवाडी गण (144)

  • सर्वसाधारण आरक्षण

9) शेटफळगे गण (132)

10) शेळगाव गण (138)

11) बोरी गण (139)

12) काटी गण (143)

13) लुमेवाडी गण (146)

*अनुसूचित जाती महिला प्रवर्ग*

14) वालचंदनगर गण (140)

15) लासुर्णे गण (141)

16) सणसर गण (142)

 

 

 

निरीक्षण अधिकारी विठ्ठल उदमले (उपजिल्हाधिकारी भूसंपादन) इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नायब तहसीलदार विजय घुगे, अविनाश डोईफोडे, स्वाती राऊत या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला यावेळी जे एस माने, दीपक पवार अजय गायकवाड या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *