शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी कृषी अधिकारी व सरपंच यांचे कौतुक

 

 

सहसंपादक दादासाहेब जगताप;सोलापूर,मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील अचानक झालेल्या शासकीय निर्णयामुळे अंकोली ग्रामपंचायत कार्यालय तसेच संबंधित सर्व विभागांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. तलाठी एम. एस. मडिखांबे, पोलिस पाटील कोंडीबा गोडसे, ग्रामसेवक निलेश जोडमोटे, कृषी सहाय्यक सागर माने, ग्रामपंचायत लिपिक निखिल पवार, सरपंच, तसेच सुनिल गवळी, शेतकरी वर्गातील अनिल (सोन्या)जगताप डॉ. नंदकुमार पवार, कुमार लिगाडे, संतोष पवार, रोहन पवार, नेताजी पवार, रोहित पवार, रोहित लिगाडे, अतुल पवार, उमाकांत लिगाडे, बाबासाहेब शिंगाडे, बाळू लिगाडे आदींनी रात्रंदिवस कामात व्यस्त राहून शेतकऱ्यांची कामे तत्परतेने पार पाडली आहेत.

 

दिनांक 13 व 14 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक लागू झालेल्या शासकीय निर्णयानंतर संबंधित अधिकारी, सरपंच व कर्मचारी यांनी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कागदपत्रे संकलित करण्यासाठी हे सर्व अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत शेतांवर गेले. मात्र काही शेतकरी त्या वेळेत शेतात नसल्याने पुढील दिवशी पुन्हा शेतावर जावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुहेरी परिश्रम करावे लागले असून, कामकाजाच्या वेळेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

 

ग्रामस्थांच्या मते, “शासकीय आदेश अचानक येत असल्यामुळे वेळेची मर्यादा कमी पडते. कर्मचारी वर्ग, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, पोलिस पाटील व सरपंच पांडुरंग येळवे,संदिप पवार ( काका) दिवस-रात्र मेहनत घेत असून, शासनाने त्यांच्या या परिश्रमाची योग्य दखल घ्यावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी व सरपंच यांचे विशेष कौतुक करण्यात आले असून, त्यांच्या प्रामाणिक परिश्रमामुळे शासकीय कामकाज वेळेत पूर्ण होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *