कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी, महानगरपालिका आयुक्त कल्याण

प्रतिनिधी,कल्याण ; कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकारी सह बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या बैठकीस परिमंडळ-3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडेसाह्ब तसेच कल्याण व डोंबिवली चे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, परिवहन व्यवस्थापक विजयकुमार द्वासे, उपआयुक्त समिर भुमकर, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, संदिप तांबे, मराविम चे कार्यकारी अभियंता व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे इतर अधिकारी तसेच आरटीओ‍, MSRTC,वाहतूक इ. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत प्रथम कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरु असणारा सॅटीस प्रकल्प कार्यान्वित होणेकामी भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. सुभाष चौक परिसरातील रस्ता रस्तारुंदीकरणात बाधित असलेल्या ऑप्टिकल इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे, सदरील ठिकाणचे आवश्यक क्षेत्र महापालिकेस प्राप्त झालेले नाही,परिणामी सुभाष चौकाकडील उड्डाणपूलाचे उताराचे कामास विलंब होत आहे. त्यामुळे कल्याण रेल्वेस्थानक कडील सुभाषचौककडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्य रस्त्याकडील परळीकर मार्गापासून रामबाग रस्त्यावरून सुभाष चौक पर्यंत एक दिशा मार्ग केल्यास उड्डाण पुलाच्या उताराच्या रिटेनिंग वॉलचे काम सुरू होऊ शकते , त्यामुळे अशाप्रकारे वाहतूक नियंत्रण करणेबाबत प्रस्ताव विशेष प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी या बैठकीत वाहतूक विभागासमोर मांडला असता त्यावर चर्चा होवून दि.05 नोव्हेंबर पर्यंत वाहतुक विभागामार्फत अधिसूचना निर्गमित करुन दि.10 नोव्हेंबर पर्यंत उड्डाण पुलाच्या रिटेनिंग वरच्या कामास सुरुवात करावी, अशा सुचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *