ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून तत्काळ कारवाईचे आश्वासन, सोलापूर खासदार ,प्रणिती शिंदे

संपादक, – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील रांझणी व कौठाळी या गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्या, विकासकामांतील अडथळे आणि ग्रामपंचायत कारभारातील अनियमिततेबाबत थेट मांडणी केली.

 

ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कारभाराविषयी तक्रारी मांडत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर प्रतिसाद देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, “या तक्रारींचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल.”

 

 

 

यावेळी खासदार शिंदे यांनी रांजणी गावाचा केंद्राच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कौठाळी गाव भंडीशेगाव मंडळात येत असल्याने, तेथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे होऊनही मदत मिळाली नाही याची नोंद घेऊन “भंडीशेगाव मंडळाचा समावेश अतिवृष्टीबाधित यादीत करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन दिले.

 

या दौऱ्यात काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, उद्योजक संजय भाकरे, सरपंच स्वाती दांडगे, कुंडलिक सुरवसे, दादा ढोले, दत्तात्रय दांडगे, महादेव ढोले, सचिन फरकंडे, मनोज यलगुलवार, नितिन शिंदे, समाधान रोंगे, फारूख बागवान, विजय ढोले, मोहन नागटिळक, महादेव गोडसे, विकास नागटिळक, सुभाष गोडसे, दशरथ नागटिळक, राजू नागटिळक, जगन्नाथ पाटील, सुरेश इंगोले, हरी सलमपुरे, किरण घाडगे, संग्राम गायकवाड, राहुल पाटील, दत्ता कांबळे, समीर कोळी, विलास रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *