पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष अतुल भैया चव्हाण यांच्यासह सर्व अभिजित आबा पाटील समर्थक अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये रोपळे गटातून इच्छुक उमेदवार सौ. प्रांजल प्रफुल्ल खरे यांच्या नावाची संभाव्य उमेदवारीची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सौ. प्रांजल प्रफुल्ल खरे या सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल भारत खरे
यांच्या पत्नी असून, त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसून पुरोगामी,शिव फुले शाहू, आंबेडकर विचारधारेच्या आहेत. त्यांच्या जनसंपर्कामुळे या उमेदवारीस बळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या वेळी रोपळे मधून रोपळे गावचे युवक नेते संचालक मा.जनक भोसले, सदाशिव खरे, सोमनाथ रोकडे अमित गायकवाड,दत्तात्रय माने,राहूल खरे ग्रामपंचायत सदस्य.विष्णू खरे,तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मा.राहूल गाडे तसेच ईश्वर वठार मधील माजी मुख्याध्यापक मा.देवानंद सरवदे आदी मान्यवर तारापूर, सुस्ते, तुंगत, जिल्हा परिषद गटातील सर्व गावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
