सोलापूर,प्रतिनिधी – दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
अंकोली : मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली गावातील आदर्श माता व समाजसेवेची ओळख असलेल्या कै. सौ. केशर तानाजी जगताप यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्मृतिपूजन व सामूहिक प्रार्थना आयोजित करण्यात आली.

कै. सौ. केशरताई या आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात कुटुंब, समाज आणि शेतकरी हितासाठी समर्पित राहिल्या. त्यांनी कष्ट, त्याग आणि प्रेमाचा आदर्श दाखवून समाजात एक दृढ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याची आणि संस्कारांची परंपरा आजही प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“आठवणीत राहतील त्या त्यागाच्या, प्रेमाच्या आणि ममतेच्या स्मृती…” 🌹🙏
भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹🙏जगताप परिवार, अंकोली
