युवा नेतृत्वाला बळ देण्याच्या उद्देशाने श्री. प्रणव परिचारक यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष

संपादक, राम गायकवाड. संविधान न्यूज चॅनल,

सोलापूर (प्रतिनिधी) — भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये युवा नेतृत्वाला बळ देण्याच्या उद्देशाने श्री. प्रणव (मालक) परिचारक यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या प्रतिष्ठित पदावर निवड करण्यात आली आहे.

 

या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून प्रणव परिचारक यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

भाजपच्या संघटनात्मक कार्यामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास जिल्ह्यातील नेतेमंडळींनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *