मोहोळच्या आमदार राजू खरे यांच्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च तालुक्यात चर्चेची झळ — रस्त्यांच्या खड्ड्यांवर खर्च नाही,

 

 

संपादक,राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.  मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या पक्षीय निष्ठेबाबत राज्यभरात विविध चर्चा रंगत असतानाच, त्यांनी दिलेल्या लोकमत दैनिकाच्या पहिल्या पानावरील लाखो रुपये ची जाहिरातीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडियावर तसेच मोहोळ तालुक्यात सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. लोक विचारत आहेत की — “आमदार साहेब लाखो रुपये जाहिरातीसाठी खर्च करू शकतात, पण मोहोळ तालुक्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी मात्र एक रुपयाही खर्च करू शकत नाहीत का?”

 

 

 

रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि विकास कामांच्या विलंबाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर जाहिरातीसाठी एवढा मोठा खर्च केल्याने विरोधकांनी तसेच जनतेने आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे.

 

राजकारणात प्रतिमा निर्माण करण्यासाठी जाहिरातींचा वापर होत असला, तरी अशा जाहिरातीमुळे जनतेच्या मनात रोष निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *