मोहोळ नगरपरिषदेसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार म्हणून सौ. शितल सुशील क्षीरसागर यांना ‘एबी फॉर्म’ प्रदान
मोहोळ प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. शितल सुशील क्षीरसागर यांना आज एबी फॉर्म देण्यात आला.
एबी फॉर्म देण्याच्या कार्यक्रमाला माजी आमदार राजन मालक पाटील तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण उपस्थित राहिले. या वेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या नेतृत्त्वाने क्षीरसागर यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांचा विकासाभिमुख दृष्टीकोन मोहोळ शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सौ. शितल क्षीरसागर यांनीही पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
