पंढरपूर:भारतीय जनता पार्टी हा पक्ष संपूर्ण देशांमध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठा पक्षी आहे महाराष्ट्र राज्यात व दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे या कल्याणकारी सत्तेच्या माध्यमातून हे सरकार पंढरपूर शहरात चा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे आज रोजी पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी प्रचार फेरीचा शुभारंभ करते समय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपले मनोगत सर्व सामान्य जनतेसमोर व्यक्त केले आज आज भाजप या पक्षाच्या प्रचार फेरीच्या वेळी पंढरपूर

नगरपालिकेसाठी नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शामल लक्ष्मण शिरसाट माजी नगर अध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसट विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर शहरांमधील 18 प्रभागांमधील भाजपचे 36 नगरसेवक पदाचे उमेदवार व असंख्य कार्यकर्ते याचवेळी उपस्थित होते पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र शहर म्हणून ओळखले जाते या शहरांमध्ये लाखोच्या संख्येने भावी भक्त येतात त्यांचा सुख सुविधा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी पंढरपूर शहराचा संपूर्ण कायापलट आणि सर्वांगीक विकास करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहेत.
आज पंढरपूर शहराचा विकास करू असे म्हणून लागली आहेत. परंतु काय विकास करणार आहे हे सर्व सांगता येत नाही विकासचे विजन विरोधकाच्या समोर नाही त्यामुळे ते असे बोलत आहेत. असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय कुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.
