मोहोळच्या विकासदृष्टीने भाजपचा दमदार प्रचारारंभ, पालकमंत्री गोरे यांचा विश्वास…     

मोहोळच्या विकासदृष्टीने भाजपचा दमदार प्रचारारंभ, पालकमंत्री गोरे यांचा विश्वास…

 

संपादक:मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहवर्धक शुभारंभ सोहळा काल दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या जल्लोषात पार पडला.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत विश्वास व्यक्त केला की,

“मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास आमच्या प्राधान्यक्रमात आहे आणि आम्ही तो नक्की पूर्ण करू.”

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांची होती.

 

या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाच्या मोहोळ नगरपरिषदेसाठीच्या सर्व अधिकृत उमेदवारांचा परिचय करून देत प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त समर्थन दर्शवले.

 

 

पालकमंत्री गोरे यांनी मोहोळ शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शहरसौंदर्यीकरण, नागरिक सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा मांडत आगामी कामकाजाबाबत आश्वासक भूमिका मांडली.

कार्यक्रमाची सांगता जयघोष, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *