उपोषणकर्त्यांना स्मशानभूमीत हलविले; संघटनेचा संताप – ‘जीविताला धोका निर्माण’
मुख्य संपादक : राम गायकवाड
पुणे, दि. 4 डिसेंबर 2025
प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या आंदोलनाचा आज २५वा दिवस असून परिस्थिती गंभीर व चिंताजनक बनली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार संघटनेचे उपोषणकर्ते पोलिस बंदोबस्तात स्मशानभूमीत हलविण्यात आले, यावर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.
संघटनेचे म्हणणे आहे की,
“उपोषणकर्त्यांना स्मशानभूमीत पाठवून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा आणि जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे मोठे षडयंत्र असून २० लाख रुपये वाटपाचेही संकेत मिळत आहेत. याची तात्काळ चौकशी पुणे पोलिस आयुक्तांनी करावी.”
स्मशानभूमीत दाखल झाल्यानंतर उपोषणकर्ते श्री. प्रदीप काळे व सौ. मीना दळे यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मारकांची हातात झाडू घेऊन अत्यंत प्रेमाने साफसफाई केली.
संघटनेचे नेते अंबादास शिंदे म्हणाले—
“आम्हाला कोणताही अनिष्ट होणार नाही. पूर्वजांच्या आशिर्वादाने हा लढा यशस्वी होणार आहे. उपोषण सुरूच राहील आणि लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.”

हातात झाडू घेऊन साफसफाई करतानाचा व्हिडिओ संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे आंदोलनाची परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे.
#sanvidhannews.com
#Facebook #punejilha
