पंढरपूर भागात आयकर विभागाकडुन कारवाई
( कान्हापुरी भागात बॅन्क खाते सीलचे चर्चेला उधाण….)
पंढरपूर (प्रतिनिधी): इन्कम टॅक्स विभाग केवळ तुमच्या-आमच्या कमाईवरच नव्हे तर बँक अकाउंटमधील छोट्यामोठ्या व्यवहारांवरही लक्ष ठेवून असतो. प्रत्येकाचे बँक खाते आणि त्यामध्ये दररोज, वार्षिक आधारावर पैसे जमा करायची मर्यादा आयकर विभागाने घालून दिली आहे. त्यामुळे बँक अकाउंटमध्ये एकाच वेळी पैसे जमा करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी भागातील एका समाजसेवकाचे बचत खातेवरुन झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक उलाढालीची चौकशी व्हावी यासाठी चक्क आयकर विभागाने सदर व्यक्तीचे बँक खाते सिल कले असल्याचे चर्चेला उधाण आले आहे
मागच्या आठवड्यात आयकर विभागाने कान्हापुरी येथील समाजसेवक नानासाहेब शिंदे यांच्या बचत खात्याअंतर्गत झालेल्या आर्थिक व्यवहारा संदर्भात चौकशी व्हावी यासाठी बँक खाते सील करण्यात आले असल्याचे चर्चा या भागात जोरदार सुरू आहे नानासाहेब शिंदे हे मागील दोन महिन्यापासून धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे स्वखर्चातून करीत आहे यामुळे त्यांचे खात्यांतर्गत कोट्यावधी रुपयाची आर्थिक उलाढाल होत असल्याने ते आयकर विभागाच्या राडारावर आले होते त्यामुळे त्यांचे खाते सिल करण्यात आले असल्याचे बँकेत रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले आहे. मात्र, समाजसेवक नानासाहेब शिंदे यांना आपले बँक खाते सील करण्यात आल्या बाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
