आमदार विक्रम पाचपुते यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला,

आमदार विक्रम पाचपुते यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला

शिरूर–श्रीगोंदा रस्त्यावरील आमरण उपोषण सहाव्या दिवशी मागे

 

श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी / अनिल बाळासाहेब पठारे

 

शिरूर–श्रीगोंदा सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निकृष्ट दर्जा, कामातील अनियमितता व कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात देवदैठण येथे सुरू असलेले मा. अनिल नामदेव बनकर यांचे आमरण उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या मध्यस्थीने प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

 

उपोषणाच्या सहाव्या दिवशी विकास महामंडळाचे अभियंता इम्रान शेख हे उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्याच्या कामातील भेगा, उघडी पडलेली खडी तसेच पुलाच्या कामातील तांत्रिक त्रुटींची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल व दोषी ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

 

मात्र, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याचे काम दर्जेदार व नियमानुसार व्हावे, अशी मागणी कायम ठेवण्यात आली आहे.

 

उपोषण समाप्तीप्रसंगी मा. सचिन कातोरे, अशोक ईश्वरे गुरुजी, विश्वास गुंजाळ (सरपंच), रवींद्र शिंदे (सरपंच, ढवळगाव), मा. संजय शेळके (मेजर), वसंत आबा बनकर, तुषार वाघमारे, संग्राम बोरगे, सचिन लोखंडे, निलेश गायकवाड, माऊली बनकर, दिलीप नरके, विजय बनकर, संतोष महाराज बनकर, अतुल गायकवाड, चत्रभुज कौठाळे, गणेश शिंदे तसेच लोणी गावचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद जठार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

तसेच आंदोलनस्थळी देवदैठण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी बेलवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार सोनवलकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *