बैलगाडी मजुरांसाठी मोफत विधी सेवा व कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….
सोलापूर,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि., कूमटे , सोलापूर येथे आज सायंकाळी ४.३० वाजता बैलगाडी स्थळावर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने बैलगाडी मजुरांसाठी मोफत विधी सेवा व कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमात श्री. ॲड. सोलंकार व श्री. ॲड. नवले यांनी उपस्थित मजुरांना शासनाच्या मोफत विधी सेवा योजना, मजुरांचे कायदेशीर हक्क, तक्रार निवारण प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती दिली.
मजुरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत उत्तरे देत कायदेशीर मदतीचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमास कारखान्याचे केन मॅनेजर श्री. पाटील, सेक्रेटरी श्री. पाटील, शेती अधिकारी श्री. बिराजदार, ऊस पुरवठा विभागाचे श्री. चिक्काळी, तसेच बगले ॲग्री ओव्हरसियर व शेती विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित अधिकाऱ्यांनी अशा उपक्रमांमुळे मजुरांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढून त्यांना त्यांच्या हक्कांविषयी आत्मविश्वास मिळतो, असे मत व्यक्त केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे बैलगाडी मजुरांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची व उपलब्ध मोफत सेवांची उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
भविष्यातही सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि., कूमटे, सोलापूर येथे अशा उपयुक्त व जनहितकारी उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
