सोलापूरच्या राजकारणात भूकंपसदृश हालचाल काडादी–गोरे भेटीने बदलली महापालिका निवडणुकीची गणिते!
पालकमंत्री जयकुमार गोरे – धर्मराज काडादी ‘मास्टरस्ट्रोक’ भेट…
महापालिका निवडणुकीत साथ देण्याचा काडादी यांचा ठाम निर्धार….
राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल मुख्य संपादक
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
शुक्रवारी गंगा निवास येथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक रणनिती तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत सखोल चर्चा झाली.

या भेटीदरम्यान धर्मराज काडादी यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा स्पष्ट शब्द दिला. त्यामुळे सोलापूरमधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शरणराज काडादी, पुष्पराज काडादी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांनी काडादी यांचे आस्थेने स्वागत स्वीकारले. यावेळी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे नियोजन, शहरातील विकासकामे, तसेच सामाजिक व राजकीय परिस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली.
लिंगायत समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून धर्मराज काडादी यांचा सोलापूर शहरात मोठा जनाधार आहे.
त्यांच्या समर्थनामुळे गोरे गटाची ताकद अधिक बळकट होणार असून निर्णायक मतदारांवर पकड मजबूत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या भेटीनंतर काडादी समर्थकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
#संविधान न्यूज चैनल
