अंकोलीत जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी 3371 पैकी 2035 मतदान; 60 टक्क्यांहून अधिक मतदान…
अंकोली (ता.मोहोळ) : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. गावातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला. अंकोली गावाची एकूण मतदारसंख्या 3371 इतकी असून त्यापैकी 2035 मतदारांनी मतदान केले. यामुळे अंकोली गावातील मतदानाची टक्केवारी सुमारे 60.4% इतकी नोंदवण्यात आली आहे.
गावातील मतदानाची आकडेवारी वार्डनिहाय पुढीलप्रमाणे आहे.
💥वार्ड क्रमांक 182 मध्ये पुरुष 393, स्त्री 338 असे एकूण 731 मतदारांनी मतदान केले.
💥वार्ड क्रमांक 183 मध्ये पुरुष 350, स्त्री 321 असे एकूण 671 मतदान झाले.
💥वार्ड क्रमांक 184 मध्ये पुरुष 361, स्त्री 272 असे एकूण 633 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण मतदानाच्या आकडेवारीवरून गावातील नागरिकांनी निवडणुकीबाबत जागरूकता दाखवली असल्याचे चित्र दिसून आले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसत होती. महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याने लोकशाही प्रक्रियेला बळ मिळाले आहे.
निवडणूक यंत्रणा, प्रशासन तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया सुरळीत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.
एकंदरीत अंकोली गावात जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले असून पुढील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
