पंढरपूरमध्ये उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी;

पंढरपूरमध्ये उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी; १६ टेबलची व्यवस्था, १२० अधिकारी-कर्मचारी नियुक्त

 

 

 

सोलापूर| प्रतिनिधी : नितीन प्रक्षाळे 

 

 

 

 

पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक ०८ तसेच पंचायत समितीच्या १६ गणासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

या निवडणुकीसाठी तालुक्यातील ३०१ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले होते. निवडणुकीत एकूण १,२८,६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये १,०५,६५७ पुरुष व २३,०२० महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत ६६३ टपाली मतदान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून मतमोजणीसाठी एकूण १६ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार राखीव टेबलचीही व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टपाली मतमोजणीसाठी गटासाठी १ टेबल व गणासाठी २ टेबल अशी एकूण ३ टेबल व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

मतमोजणी प्रक्रियेसाठी १२० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतमोजणी केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केंद्राच्या प्रवेशद्वारावर तपासणी करूनच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

 

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केवळ त्या ठिकाणीच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींना फक्त मीडिया सेंटरमध्येच मोबाईल वापरण्याची परवानगी असेल, अशी सूचनाही देण्यात आली

 

 

 

दरम्यान, प्रत्येक टेबलवरील मतमोजणी प्रक्रियेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

 

 

सदरची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगुटे तसेच उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

 

 

@मुख्य संपादक : राम गायकवाड

@संविधान न्यूज चॅनल पोर्टल*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *