एक मराठा लाख मराठा” घोषणेतून समाजएकजूट दाखविण्याचा निर्धार;

मराठा आरक्षण लढ्याचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे माचणूरमध्ये भव्य स्वागत

 

 

 

 

 

“एक मराठा लाख मराठा” घोषणेतून समाजएकजूट दाखविण्याचा निर्धार; बुधवार दिनांक:- 11/02/2026 सायंकाळी 7 वाजता स्वागत सोहळा प्रसन्न होणार…

|  : दादासाहेब जगताप (संविधान न्यूज चॅनल व पोर्टल | सहसंपादक)

 

 

 

 

गरजवंत मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्याला बळ देणारे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे संघर्षयोद्धा मनोज {दादा } जरांगे पाटील यांचे माचणूर ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथे भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

या स्वागत कार्यक्रमामध्ये “एक मराठा लाख मराठा” या घोषवाक्याच्या माध्यमातून समाजातील एकजूट दाखवून देत मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

 

 

 

या कार्यक्रमासाठी परिसरातील मराठा समाजबांधव, युवक, महिला तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

👉 कार्यक्रमाची माहिती :

📌 दिनांक : बुधवार दि. 11/02/2026

🕖 वेळ : सायंकाळी 7.00 वाजता

📍 स्थळ : माचणूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर

 

 

@संविधान न्यूज चैनल व पोर्टल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *