*लातुरमधील अनुष्का पाटोळे दलित विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्युची सीआयडी चौकशी करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
मुख्य संपादक राम गायकवाड
*दिवंगत विद्यार्थीनी अनुष्का पाटोळेच्या कुटुंबियाची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*
*दिवंगत विद्यार्थीनी अनुष्का पाटोळेला न्याय मिळवुन देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांची ना. रामदास आठवले भेट घेणार*
औसा/ मुंबई दि. 26 – लातुर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीत शिकणा-या अनुष्का पाटोळे या दलित मातंग समाजाच्या कोवळया मुलीचा विद्यालयातच संशयास्पद मृत्यु झालेला आहे. मृत्यु आत्महत्या नसुन हत्या असल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलेला आहे. या आरोपांची दखल घेवुन मयत दलित विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्युची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली.
लातुरच्या औसा तालुक्यातील टाका या गावातील दिवंगत अनुष्का पाटोळे च्या निवासस्थानी
ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी दिवंगत अनुष्का पाटोळेच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली ना. रामदास आठवले यांनी वाहिली. दिवंगत अनुष्का पाटोळे ची आई व वडिल तसेच सर्व कुटूंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी अनुष्का पाटोळे च्या आईने आपल्या मुलीची आत्महत्या झाली नसुन हत्या झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी आपण आम्हाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांच्याकडे केली. यावर ना. रामदास आठवले यांनी दिवंगत अनुष्का पाटोळेच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणाची सखोलात सखोल चौकशी करण्यासाठी ही चौकशी सीआयडी मार्फत करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. तसेच या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
दिवंगत अनुष्का पाटोळे ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. अवघ्या साडे अकरा वर्षाची मुलगी होती. ती स्वतः आत्महत्या करणं अशक्य असल्याच मत तिच्या कुटुबियांनी मांडले आहे.
दिवंगत अनुष्का पाटोळे ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिला संविधान तोंडपाठ होते. ती महात्मा ज्योतीबा फुलेंच्या जीवनावर चांगले भाषण करत होती. अत्यंत
