तब्बल रु.2,76,100/- रुग्णालयाने रुग्ण नातेवाईकांना परत दिले.

*रुग्णा हक्क संघर्ष समितीचा स्टर्लिंग हॉस्पिटल आयुर्वेदिक रुग्णालय ला दणका रुग्णांचे रु. 2,76,100/- रुपये परत*

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी: बालाजी शिंदे 

 

दि.25/02/26 पिंपरी चिंचवड रुग्ण हक्क संघर्ष समिती चा आयुर्वेदिक रुग्णालय स्नोबेल हॉस्पिटल (स्टर्लिंग हॉस्पिटल) ला दणका रुग्णांचे भरून घेतलेले तब्बल रु.2,76,100/- रुग्णालयाने रुग्ण नातेवाईकांना परत दिले.

 

 

याविषयी सविस्तर माहिती अशी की आयुर्वेदिक रुग्णालय व स्नोबेल हॉस्पिटल निगडी प्राधिकरण येथे रुग्ण बालाजी बिरादार यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णांला दाखल करून घेत असताना संबंधित रुग्णालयाने काही अनामत रक्कम भरून घेतली व उपचार चालू केला पण संबंधित रुग्ण व नातेवाईक यांची परिस्थिती ही हालाखीची असल्याने त्यांना बिल भरणे अवघड झाले होते म्हणून नातेवाईकांनी अक्षरशः खाजगी सावकाराकडून व्याजी पैसे आणून भरूनही त्यांना आणखीन पैसे कमी पडत होते तेव्हा नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समिती पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष माधुरीताई कोलते यांच्याशी संपर्क साधला व उपचारासाठी मदत मागितली. माधुरीताई कोलते यांनी रुग्णाला मदत करण्यासंदर्भात संबंधित रुग्णालयाकडे धाव घेतली व त्यांची भेट घेऊन माहिती घेतली असता संबंधित रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी रुग्णहक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड विजयभाऊ पंडित यांच्याशी संपर्क साधला व रुग्णाला मदत करण्यासंदर्भात सर्व माहिती दिली तेव्हा तेथील

 

 

जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विनायक शिंदे यांच्याशी संपर्क साधून संबंधित रुग्णांना धर्मदाय योजनेमधून उपचार करून सहकार्य करावे व संबंधित रुग्णांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्याचे सांगण्यात आले तेव्हा डॉ. विनायक शिंदे व तेथील धर्मादाय आरोग्य सेविका यांनी योजनेमधून उपचार करून दिला व रुग्ण नातेवाईकांनी भरलेले तब्बल रु 2,76,100/- चा धनादेश हे त्यांना परत करण्यात आला. यावेळी रुग्णहक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड विजयभाऊ पंडित, प्रदेश अध्यक्ष संजय बावळेकर, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष माधुरीताई कोलते, पत्रकार बालाजी शिंदे व रुग्ण नातेवाईक व जनसंपर्क अधिकारी डॉ विनायक शिंदे यांच्या हस्ते धनादेश देऊन त्यांनी भरलेली रक्कम परत करण्यात आली.

यावेळी रुग्णाक संघर्ष समितीच्या वतीने संबंधित रुग्णालय प्रशासन व जनसंपर्क अधिकारी यांचे आभार मानले.

 

@मुख्य संपादक राम गायकवाड

@संविधानन्यूजRG

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *