नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कवाडे कुटुंबीयांना सांत्वन भेट;

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कवाडे कुटुंबीयांना सांत्वन भेट; रंजनाताई कवाडे यांच्या स्मृतींना आदरांजली….

मुख्य संपादक राम गायकवाड.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) जयदीप कवाडे यांच्या मातोश्री माजी खासदार रंजनाताई कवाडे यांच्या निधनानंतर नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रंजनाताई कवाडे यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यांच्या सार्वजनिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांनी कवाडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. रंजनाताई कवाडे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला होता. त्यांच्या निधनामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कवाडे कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, विविध मान्यवरांनीही त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

@nagapur

@mukhyamantri

@maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *