दारफळ गावाजवळ जवळ भीषण अपघात; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

दारफळ गावडे जवळ भीषण अपघात; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक 

सोलापूर जिल्ह्यातील दारफळ गावाजवळ परिसरात बुधवारी (दि. ०४ मार्च २०२६) सायंकाळी सुमारे ६:३५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारफळ गावडी येथील दोन युवक मोटारसायकलवरून शेळगाव आर येथून आपल्या गावी परतत होते. यावेळी सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा अल्ट्रास या चारचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येत मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले.

या अपघातात राहुल सदिपान पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश महादेव क्षीरसागर हे गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात येत असताना त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दारफळ गावडी व परिसरात शोककळा पसरली आहे.

दोन्ही युवक अत्यंत उमद्या वयातील असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते मेहनत करून आपले आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत बिकट परिस्थितीत कष्ट करून कुटुंबाचा आधार बनलेले हे दोघे तरुण एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अत्यंत मेहनती, साधे व कुटुंबवत्सल स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे हे दोघे युवक अचानक निघून गेल्याने गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम गावकरी व नातेवाईक करत असून, ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.

संविधान न्यूज चॅनल व पोर्टल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *