तारापूर येथे ज्ञानविष्कार क्रिडो एक्झिबिशनचे आयोजन; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे होणार प्रदर्शन
मुख्य संपादक राम गायकवाड
तारापूर येथील किशोर निर्मल इंग्लिश मीडियम स्कूल व श्री दर्लिंग विद्यामंदिर यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानविष्कार क्रिडो एक्झिबिशन” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली कौशल्ये, कल्पकता आणि ज्ञानाचे सादरीकरण घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून या प्रदर्शनात विविध शैक्षणिक प्रकल्प, उपक्रम तसेच कृतीआधारित शिक्षणाची झलक पाहायला मिळणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणे आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचा अनुभव देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकल्प, विज्ञानाधारित प्रयोग, शैक्षणिक मॉडेल्स तसेच कौशल्याधारित उपक्रम या एक्झिबिशनमध्ये सादर केले जाणार आहेत. यामुळे पालक, शिक्षक व नागरिकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष ओळख होणार आहे.
हा कार्यक्रम रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण किशोर निर्मल इंग्लिश मीडियम स्कूल व श्री दर्लिंग विद्यामंदिर, तारापूर असे आहे.
या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षिका सौ. निता यशवंत (तात्या) माने (मॅडम) या सन्माननीय उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भूषण दिलीपकुमार शहा (सर्वेसर्वा – मरवडेकर मोबाइल शॉपी) उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. श्री. सुभाष अंधराव (सर), सहाय्यक केंद्रप्रमुख, तुगन केंद्र हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनासाठी क्रीडो मार्गदर्शक शिक्षक म्हणून तुषार जाधव (सर), अभिजीत मोकाशी (सर), ब्रजेश शेख (सर) आणि अंबिका बिराजदार (मॅडम) हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे छोटे निमंत्रक म्हणून इयत्ता नर्सरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून केला जात आहे.
शाळेमध्ये नर्सरी ते सिनियर केजी तसेच इयत्ता पहिली ते सातवी (NCERT – CBSE) आणि S.S.C स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम अशा अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध असून आधुनिक शिक्षणपद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. तसेच १५ मार्चपासून नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शाळेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या अनोख्या ज्ञान अविष्कार क्रिडो एक्झिबिशन” कार्यक्रमाला पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
