AI तंत्रज्ञानासह आरोग्य सेवा गावात; अंकोली येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १९३ जणांची तपासणी…
मुख्य संपादक राम गायकवाड
सोलापूर,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथे आज
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने Alivus Life Sciences यांच्या वतीने सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत अंकोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवेची नवी दिशा मिळाल्याचे दिसून आले.
या शिबिराला सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. यामध्ये पप्पू पाटील (शेतकरी संघटनेचे अध्यक्ष), पंडित घाडगे, अनिल लिगाडे, चैतन गायकवाड, बाबा गवळी, प्रभाकर पवार तसेच अंकोली गावचे सरपंच संदीप पवार (काका) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला.

सदर आरोग्य शिबिराचे आयोजन अंकोली गावातील माजी सरपंच संदीप पवार (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनात डॉक्टर संदीप पुरी (मॅनेजर, सेवामोब), डॉक्टर सुजाता स्वामी (मेडिकल ऑफिसर, सोलापूर), डॉक्टर तेजस्विनी नांदेडकर ,पुरी(को-ऑर्डिनेटर, सेवामाॅब), एम.डी. अमीर (आय-टेक्निशियन), डॉ. अनिकेत माने तसेच नर्सिंग स्टाफ यांचे विशेष योगदान लाभले.
या शिबिरामध्ये संगणकीकृत डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप, सामान्य आरोग्य तपासणी, रक्त तपासणी तसेच AI आधारित आरोग्य सल्ला व आहार मार्गदर्शन देण्यात आले. तपासणीनंतर गरजू नागरिकांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन Sevamb यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, एकूण १९३ महिला व पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला.
एकूणच, या आरोग्य शिबिरामुळे अंकोली गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
