द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
मंगळवेढा तालुक्यातील मौजे माचणूर परिसरातील सर्वांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केलेल्या संकेत डोके यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आजही त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात जिवंत असून त्यांची उणीव सतत जाणवत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संकेत हे स्वभावाने अत्यंत मनमिळावू, हसतमुख व मदतीस तत्पर असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सहवासात राहणाऱ्या प्रत्येकासाठी ते आनंदाचे कारण ठरत. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात व मित्रपरिवारात नेहमीच आनंदाचे वातावरण निर्माण होत असे. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
“संकेत, तुझं असणं हे आमच्यासाठी हसणं होतं… आता सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुझ्या नसण्याची तीव्र उणीव आहे…” अशा भावनिक शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आठवणी आजही मनात जिवंत असून त्यांचे स्मरण करताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.
द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्या कार्याची व स्वभावाची आठवण करून देत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना केली.
सहसंपादक,दादासाहेब जगताप
संविधान न्यूज चैनल व पोर्टल
