ग्रामपंचायतीतील कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंकोलीत सिद्धार्थ तरुण मंडळाचा संविधान जनजागृती व सामाजिक ऐक्याचा उपक्रम; ग्रामपंचायतीतील कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंकोली (प्रतिनिधी : दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक) :

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथे युवकांमध्ये सामाजिक जाणीव वाढविणे, समाजात एकोपा आणि बंधुता निर्माण करणे तसेच भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांविषयी जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने सिद्धार्थ तरुण मंडळ, अंकोली यांच्या वतीने संविधान जनजागृती व सामाजिक ऐक्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अंकोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावातील युवक, शालेय विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

 

 

 

सध्याच्या सामाजिक परिस्थितीत युवकांनी संघटित होऊन समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे. याच विचारातून सिद्धार्थ तरुण मंडळाच्या माध्यमातून गावात संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाच्या माध्यमातून युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणे, शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे या उद्दिष्टांवर भर देण्यात येत आहे.

 

 

कार्यक्रमादरम्यान संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली. समाजात सलोखा टिकवण्यासाठी परस्पर सहकार्य, बंधुता आणि एकात्मतेची भावना जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. युवकांनी समाजाच्या विकासासाठी पुढे येऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, गावातील शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य संदीप (काका) पवार, पांडुरंग येळवे, उपसरपंच अजिंक्य क्षीरसागर, तसेच चेतन गायकवाड यांनी सक्रिय सहकार्य केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सामाजिक उपक्रमांना पाठिंबा मिळत असल्यामुळे युवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष रणजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. मंडळाचे उपाध्यक्ष नाना कुचेकर आणि सचिव मंगेश सोनवणे हे युवकांना एकत्र आणून समाजहिताचे कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक युवक सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होत असून त्यामुळे अंकोली गावात सामाजिक सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्य समाधान गायकवाड, जोगेंद्र गायकवाड, आबासाहेब कुचेकर, नाना गायकवाड, संतोष गायकवाड, योगेश गायकवाड, पंकज तुपसमिदर तसेच बाबासाहेब रणदिवे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मंडळाच्या कार्याला मोलाचे सहकार्य केले.

तसेच अंकोली येथील भीमसैनिकांनीही या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून युवकांना प्रोत्साहन दिले. यामध्ये सचिन गायकवाड, जितेंद्र गायकवाड, समाधान माणिक गायकवाड, पप्पू गायकवाड, प्रविण गायकवाड, भैय्या गायकवाड, विकास गायकवाड, समाधान कुचेकर, विलास गायकवाड, दिलीप गायकवाड, नाना गायकवाड, संतोष गायकवाड, योगेश गायकवाड, पंकज तुपसमिदर, हणमंत सोनवणे आणि किरण गायकवाड यांनी मंडळाच्या कार्याला पाठिंबा देत समाजातील युवकांना एकत्र आणण्याचे काम केले.

कार्यक्रमादरम्यान गावातील विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः युवकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, सामाजिक भेदभाव कमी करून सर्व समाज घटकांमध्ये ऐक्य निर्माण करणे आणि संविधानातील मूल्यांची जपणूक करणे यासंदर्भात उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली.

दरम्यान अंकोलीचे पोलीस पाटील कोंडीबा (बापू) गोडसे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. गावातील युवकांनी समाजहितासाठी पुढे येऊन संघटितपणे काम करणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गावात सामाजिक सलोखा वाढतो आणि विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.

सिद्धार्थ तरुण मंडळाच्या माध्यमातून भविष्यात युवक मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक मदत, संविधान जनजागृती कार्यक्रम, सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती मोहिमा, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

गावातील युवक एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करत असल्यामुळे अंकोली परिसरात या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनीही मंडळाच्या या सामाजिक कार्याला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून युवकांचे हे संघटन भविष्यात गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *