पंढरपूर बुद्धभूमीला अखेर गती : उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे आदेश
आमदार Raju Khare व रिपाइं नेते दिपक चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..
मुख्य संपादक : राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल..
पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील यमाई तलावाजवळ शासन मालकीच्या सुमारे १० एकर (४ हेक्टर) जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार तथा विपस्सना केंद्र उभारण्याच्या मागणीला अखेर गती मिळाली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
पंढरपूर नगरपरिषदेकडून दि. १७ मार्च २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत हद्दखुणा कायम करून नकाशासह अ, ब, क, ड प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. मात्र गेल्या १४ वर्षांपासून बुद्धभूमी कृती समितीकडून सातत्याने आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही संबंधित जागेचा ७/१२ उतारा तयार होणे व अंतिम मंजुरीचा प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
ही गंभीर बाब आमदार Raju Khare तसेच रिपाइं नेते दिपक चंदनशिवे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी कृती समितीचे कार्याध्यक्ष व रिपाइं नेते दिपक चंदनशिवे, महेश मोटे, योगेश जाधव, अमित कसबे, लाकियत मुलाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेताना आमदार Raju Khare, पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी कृती समितीचे कार्याध्यक्ष व रिपाइं नेते दिपक चंदनशिवे आदी.
