💥तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड – रामदास आठवले यांचा कुर्डूवाडीत गौरव सोहळा..
✍️ मुख्य संपादक : राम गायकवाड, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल,
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांची राज्यसभा खासदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल कुर्डूवाडी येथे त्यांचा अत्यंत भव्य व उत्साहपूर्ण सत्कार सोहळा पार पडला.
या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या हस्ते श्री. आठवले यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. सभागृहात विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी महाराष्ट्र संघटक सुनील सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव नागनाथ वोहोळ, पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष हनुमंत कसबे, रजनीश कसबे, विकी कांबळे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सत्कार समारंभासाठी दूरदूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थितांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आठवले साहेबांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
वक्त्यांनी सांगितले की, आठवले साहेबांनी सामाजिक न्याय, वंचित घटकांचे हक्क, दलित-बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत आठवले साहेबांच्या कार्याला सलाम केला व त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
समारोपाच्या वेळी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. हा सत्कार सोहळा कुर्डूवाडी परिसरात एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.
