🚨 पुणे ग्रामीण पोलीस दलाला मिळाले नवे सक्षम नेतृत्व 🚨
🌟 डॉ. शुभमकुमार (IPS) यांची पदोन्नतीने अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पदी निवड; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव 🌟
✍️ अंकोली, प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप
पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद बातमी समोर आली असून कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, अभ्यासू आणि जनतेप्रती संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. शुभमकुमार (IPS) यांची पदोन्नतीने अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. शुभमकुमार यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत प्रभावी आणि लोकाभिमुख काम करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील मौजे चळे, रझणी, विटे, सरकोली, ओझेवाडी आणि गोपाळपूर या गावांमध्ये त्यांनी शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले होते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
त्यांनी आपल्या कार्यकाळात वाळू तस्करीसारख्या अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करत अनेक समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अनेक गुन्हेगार आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले असून त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
डॉ. शुभमकुमार यांच्या उल्लेखनीय आणि जनतेसाठी केलेल्या कामाची दखल घेत अनेक सामाजिक स्तरांतून त्यांना “फुलाजी पाकळी” म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख प्रशासनामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक आदर्श अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पोलीस प्रशासनामध्ये पारदर्शकता, तत्परता आणि जनसहभाग वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शांत, संयमी आणि अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे पोलीस दलात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस स्टेशनचे कर्तबगार अधिकारी श्री गजानन माळी साहेब यांनी डॉ. शुभमकुमार यांचा विशेष सत्कार केला. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारे, सर्वांचे आवडते आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले गजानन माळी साहेब यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
💐 कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवेच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल डॉ. शुभमकुमार (IPS) साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रशासकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐
